पनवेल ः रामप्रहर वृत्त
आकुर्ली (नवीन पनवेल) येथे नुकतीच जिल्हास्तरीय थाय बॉक्सिंग स्पर्धा झाली. या स्पर्धेत युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन इंडिया (यूएसकेएआय)च्या खेळाडूंनी यश संपादन केले.
यूएसकेएआयच्या प्रद्युम्न म्हात्रे, आरव शेट्टी, अलोक निर्मल, अर्णव खन्ना, यश काटेकर, आयुरी धुमाळ, शशांक शेट्टी, साक्षी मुरडेकर, अनुष्का जगदाळे, वैष्णवी मुरडेकर, प्रणय दुरकर, श्रीवास पाटील, उदय आव्हाड, अर्णव साळुंखे, आकांक्षा दहिफळे यांनी सुवर्णपदक, महेश दाभाडे, प्रेम वेनुपुरे, ऋषिकेश साळुंके, स्वरांगी यादव, आदर्श कानू, नवीन पडवल यांनी रौप्यपदक जिंकले.
सर्व खेळाडूंना संस्थेचे अध्यक्ष डॉ. मंदार पनवेलकर, मुख्य प्रशिक्षक प्रशांत गांगर्डे, रोहित भोसले, मनीष पनवेलकर, प्राची पवार यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडूंची महाबळेश्वर येथे होणार्या राज्यस्तरीय थाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …