Friday , June 9 2023
Breaking News

पनवेल तालुका क्रीडा संकुलामध्ये ओपन जीम

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल तालुका क्रीडा संकुलामध्ये ओपन जीमची साधने बसविण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे एका बाजुला खो खोच्या मैदानाचे काम सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना तेथे आता व्यायाम करता येणार आहे, तसेच शालेय विद्यार्थ्यांना खो-खो प्रशिक्षणसुद्धा मोफत मिळणार आहे.

पनवेल शहरातील तालुका क्रीडा संकुलाचे एक वर्षापूर्वी राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. सध्या येथे पे अ‍ॅण्ड प्ले या तत्वावर बॅडमिंटनचे प्रशिक्षण दिले जाते, तसेच काही दिवसांपूर्वी येथे तिरंदाजीच्या प्रशिक्षणाला सुरुवात करण्यात आली. अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे येथे ओपन जिमचे साहित्य बसविण्यात आले असून, सध्यातरी कोणत्याही प्रकारची फी आकारली जाणार नसल्याने नागरिकांना मोफत व्यायाम करता येणार आहे. त्याचप्रमाणे एका बाजूला शालेय विद्यार्थ्यांसाठी खो-खो चे मैदान तयार करण्यात येत असून, 1 मेपासून प्रशिक्षणाला सुरुवात करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे शालेय विद्यार्थ्यांना पूर्णपणे मोफत या प्रशिक्षणाचा लाभ घेता येणार आहे.

Check Also

कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर शांतता कमिटीची बैठक

पनवेल : वार्ताहर सध्या महाराष्ट्रात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व स्टेटस वायरल होत असल्याने हिंदुत्ववादी …

Leave a Reply