Breaking News

पीर करमअली शहा बाबांना 70 फूट फुलांची चादर अर्पण; लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य

पनवेल : रामप्रहर वृत्त

राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त पनवेल शहरातील हजरत ख्वॉजा पीर करमअली शाह चिश्ती रहमतुल्ला आलैह बाबांच्या दर्ग्यात 70 फुट फुलांची चादर अर्पण करण्यात आली. तसेच नवसाला पावणारा म्हणूनच प्रसिद्ध असणार्‍या आणि सर्व जातीधर्मातील भाविकांचे श्रद्धास्थान असणार्‍या या दर्ग्यात लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रतिष्ठानचे महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक यांच्यासह उपस्थितांनी दुवाही मागितली. लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 70वा वाढदिवसानिमित्त तालुक्यात निरनिराळे उपक्रम राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक यांनी 70 उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच उपक्रमांतर्गत गुरुवारी (दि. 18) येथील प्रसिद्ध श्रद्धास्थान असलेल्या हजरत ख्वॉजा पीर करमअली शाह चिश्ती रहमतुल्ला आलैह बाबांच्या दर्ग्यात 70 फुट फुलांची चादर अर्पण करण्यात आली. लोकनेते रामशेठ ठाकूर यांना या अशा अनोख्या शुभेच्छा देताना केवल महाडिक आणि त्यांच्यासेबत असणार्‍या कोकण  डायरीचे संपादक तसेच भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा नवी मुंबई प्रभारी सय्यद अकबर, आदिवासी सम्राटचे संपादक गणपत वारगडा, सदाशिव मोरे, ओमकार महाडिक, रहिस शेख यांच्यासह दर्ग्यातील मान्यवरांनीही या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांना निरोगी दीर्घायुष्य लाभावे यासाठी बाबांकडे दुवा मागितली.

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply