Breaking News

तहसील कार्यालयासमोर होतेय वाहतूक कोंडी

पनवेल : बातमीदार

साईनगर येथील तहसील कार्यालयासमोर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. अनेक चारचाकी वाहने अस्तावस्त पार्क करत असल्याने नागरिक वैतागले आहेत. तहसील कार्यालय व शहर पोलीस स्टेशन यामुळे साईनगर परिसर नेहमी गजबजलेला असतो. नागरिकांची व वाहनांची मोठ्या प्रमाणात येथे वर्दळ सुरू असते. येथे वाहने कशीही पार्क करत असल्यामुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत. रस्त्यावरच वाहने पार्क होत असल्याने काही वेळेला पोलिसांची वाहने पोलीस स्टेशनमध्ये जाण्यासाठी समस्या निर्माण होत आहे. एखाद वेळेस तहसीलदारांची गाडी लावण्यासाठी देखील येथे जागा नसते. अस्तावस्त लावलेल्या गाड्यांचा त्रास येथील नागरिक, तसेच शासकीय अधिकारी, पोलीस यांना सहन करावा लागत आहे. वाहतूक पोलिसांनी वेळीच यावर कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply