कर्जत ः बातमीदार
केंद्र सरकारच्या क्रीडा विभागाकडून झारखंड येथे आयोजित करण्यात आलेल्या ऑल इंडिया स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील बबन बाबू झोरे यांनी दोन सुवर्णपदके पटकाविली असून, त्यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
झारखंड येथे झालेल्या ऑल इंडिया पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत देशातील 28 घटक राज्ये आणि आठ केंद्रशासित प्रदेशांतील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यामध्ये कर्जत तालुक्यातील खैराट गावचे सुपुत्र बबन झोरे यांनी दोन सुवर्णपदके जिंकली. या कामगिरीमुळे त्यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली असून, ते भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. याबद्दल झोरे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …