अबुधाबी ः वृत्तसंस्था
अफगाणिस्तानने तिसरा आणि अखेरचा टी-20 सामना 47 धावांनी जिंकत झिम्बाब्वेला 3-0ने क्लीन स्वीप केले. या सामन्यात अफगाणिस्तानचा कर्णधार असगर अफगान याने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत काढला.
अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 183 धावांचा डोंगर उभारला. सलामीवीर रहमनुल्लाह गुरबाझ (18) याला मोठी खेळी करण्यात अपयश आले. तेव्हा उस्मान घानी (39) आणि करीन जनत (21) यांनी अफगाणिस्तानचा डाव सावरला. यानंतर नजीबुल्लाह जाद्रान याने 35 चेंडूंत नाबाद 72 धावांची तडाखेबंद खेळी केली. यात त्याने 5 चौकार आणि 5 षटकार खेचले.
प्रत्युत्तरात झिम्बाब्वेचा संघ 5 बाद 136 धावाच करू शकला. तारीसाई मुसाकांडा (30), सिकंदर रझा (नाबाद 41) आणि रियान बुर्ल (नाबाद 39) यांनी संघर्ष केला, पण ते संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत.
अफगाणिस्तानचा हा विजय कर्णधार असगर अफगान याच्यासाठी विक्रमी ठरला. आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात सर्वाधिक 42 सामने जिंकणार्या कर्णधाराचा मान त्याने पटकावला. महेंद्रसिंह धोनीने 72 सामन्यांत 41 विजय मिळवले होते, तर असगरने 52 सामन्यांत 42 विजय मिळवले आहेत.
Check Also
कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …