Breaking News

पनवेलमध्ये गणेशोत्सवात ज्वालासुराचा वध देखावा

पनवेल : रामप्रहर वृत्त

गणेशोत्सव म्हटले की आकर्षक रोषणाई, भव्य देखावे यांची रेलचेल. काही देखावे डोळ्यांना सुखावतात, तर काही देखावे प्रबोधनात्मक असतात. यातच पनवेलमधील मदन कोळी यांनी लोकमान्य टिळक यांना अभिप्रेत सार्वजनिक गणेशोत्सवाचा वारसा जपण्याचा नेहमी प्रयत्न केला आहे. गेली 60 वर्षे गणेशभक्तांना वेगवेगळ्या देखाव्याने आकर्षित करणार्‍या पनवेलमधील या कोळी परिवाराने आयोजित केलेल्या या वर्षीच्या गणेशोत्सवात ज्वालासुराचा वध या देखाव्याने रंगत आणली आहे. पनवेल शहरातील मिडलक्लास हौसिंग सोसायटी येथे असलेल्या या उत्सवाचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मदन कोळी यांनी केले आहे.

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply