पनवेल : वार्ताहर
अंत्योदय व अन्नसुरक्षा योजनेंतर्गत लाभ घेणार्या सर्व शिधापत्रिका धारकांची तपासणी मोहीम पनवेल पुरवठा विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. ज्यांच्या कुटुंबाच्या उरकून वार्षिक उत्पन्न 59 हजारांच्यावर आहे. त्यांना अन्नसुरक्षा योजनेंतर्गत वगळण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मोहीम सुरू झाली आहे. कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न 59 हजाराच्यावर (ग्रामीण भाग 44 हजार) त्यांचे विवरण प्रशासनाला हमीपत्राद्वारे कळवावे, असे आवाहन पनवेल पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या आदेशानुसार पुरवठा विभागाकडून सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत शिक्षापत्रिकांची तपासणी मोहीम सुरू केली आहे. जास्त उत्पन्न असलेल्या कुटूंबप्रमुखांचे रेशनकार्ड रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला. या अंतर्गत अंत्योदय, अन्नपुर्णा, केशरी, विविध प्रकारच्या शिधापत्रिकांची तपासणीसाठी मोहिम राबविण्याचे आदेश शासनाने दिले आहे. त्यानुसार जिल्हा पुरवठा विभागाकडून पनवेल पुरवठा विभागाला या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे सांगितले आहे. त्यानुसार 1 मार्चपासून पनवेल तहसील विभागातील पुरवठा विभागाकडून रेशन कार्डवरील उत्पन्नाचे शोध मोहीम सुरू झाली आहे. ही मोहीम 15 एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. या मोहिमेदरम्यान शिधापत्रिका धारकांकडे गॅस असल्यास त्याची सर्विस्तर माहीत द्यावी लागणार आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली शोधमोहीम समिती गठीत करण्यात आली आहे. अंत्योदय योजनेतील लाभार्थींने एकूण उत्पन्नाचे विवरण हमीपत्राद्वारे प्रशासनाला द्यावे लागणार आहे. यापूर्वी विदेशी नागरिकांना शिधापत्रिका वितरित केली आहे का याचीही तपासणी होत आहे. विशेष म्हणजे एकाच पत्त्यावर दोन शिधापत्रिकाधारकांची नावे असल्यास त्यातील एक शिधापत्रिका रद्द होईल. सरकारी किंवा खाजगी कंपनीतील कामागारांचे ज्याचे उत्पन्न 59 हजारावर असल्यास त्याची शिधापत्रिका रद्द होईल. ज्यांचे उत्पन्न चांगले आहे. स्वच्छेने अंत्योदय किंवा अन्नसुरक्षा यपजणेतून बाहेर पडावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पनवेल पुरवठा विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पनवेल तालुक्यात अंत्योदय व अन्नसुरक्षा योजनेचे लाभ 68 हजार 442 कार्डधारक घेत आहेत. या मोहिमेसाठी तालुक्यातील 38 तलाठी व त्यांचे सहकारी यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. असे झाल्यास खर्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.