माणगाव ः प्रतिनिधी
माणगाव तालुका पत्रकार संघातर्फे सामाजिक बांधिलकी जपत अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. त्या अनुषंगाने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता शहरात जुने स्टँड येथे रविवारी (दि. 21) सायंकाळी माजी नगराध्यक्ष योगिता चव्हाण, राजिपचे माजी सभापती ज्ञानदेव पवार, यशस्वी उद्योजक विजयशेठ मेथा यांच्या हस्ते 500 मास्कचे वाटप करण्यात आले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता माणगाव शहरात बिनधास्तपणे फिरणार्या नागरिकांना पत्रकार संघातर्फे मोफत मास्कचे वाटप करण्यात आले. या वेळी येथील वाहतूक पोलिसांनी विनामास्क फिरणार्या नागरिकांना सोडून देऊन त्यांना मास्क दिले, मात्र यापुढे कोणी विनामास्क दिसल्यास 500 रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचे सांगितले. या कार्यक्रमास पत्रकार संघाचे ज्येष्ठ सल्लागार मजिद हाजिते, डॉ. आरिफ पागारकर, सचिन देसाई, कार्याध्यक्ष प्रभाकर मसुरे, प्रा. हर्षल जोशी, प्रा. शंकर शिंदे, आरोग्यसेवक राजेंद्र खाडे, एकता असोसिएशनचे संस्थापक राहुल दसवते, सामाजिक कार्यकर्ते सुनीलदत्त चव्हाण, वाहतूक पोलीस विशाल येलवे, रावसाहेब कोळेकर, अक्षय जाधव, लालासो वाघमोडे, पोलीस हवालदार कदम यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.