पुणे ः प्रतिनिधी
भारतीय संघाकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा कर्नाटकचा वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाने आपल्या तेजतर्रार गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. 25 वर्षीय कृष्णाने इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करीत इंग्लंडच्या चार फलंदाजांना तंबूचा मार्ग दाखवला. या कामगिरीसह कृष्णाने 24 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे.
एकदिवसीय क्रिकेट पदार्पणात सर्वोत्तम कामगिरी करणार्या गोलंदाजांमध्ये कृष्णाचे नाव घेतले जाणार आहे. त्याने माजी क्रिकेटर नोएल डेव्हिड यांचा 24 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला आहे. 1997मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पण करताना डेव्हिड यांनी 21 धावा देऊन तीन बळी घेतले होते, तर इंग्लंडविरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात कृष्णाने 8.1 षटकांत 54 धावा देत चार बळी टिपले. सुरुवातीच्या काही षटकांमध्ये महागडा ठरलेल्या कृष्णाने सामन्याच्या उत्तरार्धात चमकदार कामगिरी केली.
सूर्यकुमारला मिळणार संधी?
दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यात शुक्रवारी दुसरा एकदिवसीय सामना होणार आहे. या सामन्यात भारतीय संघव्यवस्थापनाकडून सूर्यकुमार यादवला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यातही पदार्पणाची संधी मिळू शकते.
Check Also
सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …