मुंबई ः प्रतिनिधी
भारताची बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा लवकरच तमिळ सुपरस्टार विष्णू विशाल याच्याशी विवाहबंधनात अडकणार आहे. दरम्यान, दोघांचेही पहिले लग्न झालेले असून, घटस्फोटानंतर ते विभक्त राहात आहेत.
विष्णू विशाल हा तमिळ सिनेमाचा एक मोठा सुपरस्टार आहे. चित्रपटाच्या जगाशिवाय तो आपल्या भव्य शरीरयष्टीबाबत खूप चर्चेत असतो. तो लवकरच दक्षिणेतील सर्वात मोठा सुपरस्टार असणार्या राणा दुग्गूबातीसमवेत ’अरण्या’ या चित्रपटात दिसणार आहे.
विष्णू विशाल आणि ज्वाला गुट्टा या दोघांनी पहिल्या लग्नानंतर घटस्फोट घेतला. विशालने प्रथम रजनीशी लग्न केले. इतकेच नाही तर त्याला एक मुलगादेखील आहे, ज्याचे नाव आर्यन आहे. तथापि, मतभेदांमुळे या दोघांचा घटस्फोट 2018मध्ये झाला, तर ज्वालाचे चेतन आनंदशी लग्न झाले आणि 2011मध्ये त्यांचाही घटस्फोट झाला आहे.
Check Also
तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा
कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …