Breaking News

उरण महाविद्यालयाचा पदवीदान समारंभ उत्साहात

उरण : रामप्रहर वृत्त

कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील  शैक्षणिक वर्ष 2019-2020 मध्ये बि. कॉम., बि. ए., बि कॉम (अकाउटींग अ‍ॅन्ड फायनान्स) व एम. कॉम अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यास आल्या. या पदवीप्रदान कार्यक्रमांचे अध्यक्ष संस्थेचे सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिपचंद्र श्रृंगारपुरे हे होते. प्रमुख अथिती बेलापूर येथील स्पिडी मल्टीमोड्म लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर आशिष चंदना हे होते. त्यांनी यशस्वी होण्यासाठीचे सहा मार्ग व त्यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास विद्यार्थ्यांना समोर मांडला. या कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य के. ए. शामा, महाविद्यालय विकास समिती सदस्य रमेश ठाकूर, नवीन राजपाल, ज्येष्ठ प्रा. व्हि. एस. इंदुलकर, माजी विद्यार्थी नजीम शेख आदी उपस्थित होते. या पदवी प्रदान समारंभात एकूण बि कॉम 20, बी. ए. अर्थशास्त्र 15, भूगोल 13 व इतिहास 17, बि. कॉम (ए अ‍ॅन्ड एफ) 20 व एम्. कॉमच्या 20 विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. तसेच शैक्षणिक वर्ष 2019-2020 मध्ये सर्व विभागातील प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना 2500 रुपये व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. हन्नत शेख यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत व परिचय प्रा. डॉ. पराग कारुळकर व आभार प्रदर्शन प्रा. डॉ. डी. पी. हिंगमीरे यांनी केले. कोविड-19 च्या प्रभावामुळे निवडक विद्यार्थ्यांनाच पदवीप्रदान कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते.

पनवेल : कोळीवाडा येथे गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत होता. नागरिकांनी ही समस्या नगरसेविका दर्शना भोईर यांना सांगितल्यावर त्यांनी समस्येचे गांभीर्य लक्षात घेत या विभागात असलेली नादुरुस्त पाण्याची टाकी दुरुस्त करून घेण्याचे काम सुरू करण्यास सांगितले होते. या कामाची पाहणी गुरुवारी नगरसेविका दर्शना भोईर यांनी केली. या वेळी त्यांच्यासोबत नगरसेवक मुकिद काझी, मनपा अधिकारी, श्री. तायडे, अविनाश पाटील, भाजप कायर्र्कर्ते राकेश भोईर, गणेश भगत, योगेश कोळी आदी उपस्थित होते.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply