Breaking News

मुंबईत मॉलला भीषण आग; 10 जणांचा मृत्यू

मुंबई ः प्रतिनिधी
भांडूपच्या ड्रीम्स मॉलमध्ये लागलेल्या भीषण आगीत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी (दि. 26) मध्यरात्री 12.30च्या सुमारास ही आग लागली होती. आगीची झळ मॉलमधील सनराइज रुग्णालयाला बसली.
ड्रीम मॉलमध्ये तिसर्‍या मजल्यावर सनराइज हॉस्पिटल आहे. आगीचा भडका उडाला आणि पाहता पाहता हॉस्पिटललाही आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 20हून अधिक वाहने घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. रुग्णालयातील 10 रुग्णांचा गुदमरून मृत्यू झाला, तर 69 रुग्णांची सुटका करण्यात आली. अग्निशमन दलाच्या अधिकार्‍यांच्या मदतीने या रुग्णांना शिडीच्या मदतीने एक-एक करून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना जवळच्या कोविड रुग्णालयात दाखल केले गेले.
निसार जावेदचंद (वय 74), मुणगेकर (वय 66), गोविंदलाल दास (80), मंजुळा भटारिया (65), अंबाजी पाटील (65), सुनंदाबाई पाटील (58), सुधीर लाड (66) अशी मृतांची नावे आहेत. तीन मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही, तसेच आगीचे कारण समजू शकलेले नाही.
या सरकारला कधी जाग येणार? ः फडणवीस
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या घटनेत राज्य सरकार, मुंबई महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष व ढिसाळपणा स्पष्टपणे दिसतो आहे. या संदर्भात आता काही फार बोलणे योग्य होणार नाही, कारण आता लोकं दुःखात आहेत. आणखी किती जणांचा मृत्यू झाल्यानंतर या सरकारला जाग येणार आहे, असा सवाल या वेळी फडणवीस यांनी उपस्थित केला.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply