पेण : प्रतिनिधी
रस्ता व पाण्याच्या प्रश्नांसाठी राजकारण नको, समाज घडविण्यासाठी राजकारण बाजूला ठेवून एकसंगी व्हा, असे आवाहन माजी कॅबिनेट मंत्री तथा विद्यमान आमदार रविशेठ पाटील यांनी शिर्की येथे रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना केले. आमदार रविशेठ पाटील यांच्या आमदार निधीतून बोरी बायपास हायवे ते बोरी-शिकी, शिर्की-मसद ते शिर्की चाळ रस्ता नूतनीकरण करून डांबरीकरण करण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा शिर्की येथे झाला. या वेळी रविशेठ पाटील यांच्यासोबत बालाजी म्हात्रे, भाजप तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील, लक्ष्मण जांभळे, माजी जि.प. सदस्य वैकुंठ पाटील, अमृत म्हात्रे, धनाजी भोईर, शिर्की सरपंच धनश्री पाटील, मसद सरपंच बळीराम भोईर, बोरी उपसरपंच रवींद्र म्हात्रे, शिर्की उपसरपंच प्रवीण पाटील, शेखर पाटील, नितीन भोईर, चंद्रकांत पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमात वैकुंठ पाटील, श्रीकांत पाटील, जांभळे, बळीराम भोईर यांनी मार्गदर्शन केले. प्रस्ताविक गणेश पाटील यांनी केले. सरपंच धनश्री पाटील यांनी या विभागातील पाणी व इतर प्रश्न सोडविण्याची मागणी केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन भोईर यांनी केले.