Breaking News

भाजप खारघर मंडल शक्ती केंद्रप्रमुखांच्या बैठकीत ठाकरे सरकारवर हल्लाबोल

पनवेल ः रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्ष खारघर मंडलच्या शक्ती केंद्रप्रमुखांची बैठक शुक्रवारी (दि. 26) भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकात पाटील आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. या वेळी प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भ्रष्ट कारभारावरून ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. या वेळी त्यांनी शक्ती केंद्रप्रमुखांना मार्गदर्शनही केले.
भारतीय जनता पक्ष खारघर मंडलच्या शक्ती केंद्रप्रमुखांची बैठक जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून झाली. या बैठकीला भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, महापौर डॉ. कविता चौतमोल, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, दीपक बेहरे, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, प्रभाग समिती ‘अ’ सभापती अनिता पाटील, नगरसेवक हरेश केणी, अभिमन्यू पाटील, प्रवीण पाटील, शत्रुघ्न काकडे, रामजी बेरा, नरेश ठाकूर, निलेश बाविस्कर, नगरसेविका आरती नवघरे, संजना कदम, हर्षदा उपाध्याय, शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, सरचिटणीस दीपक शिंदे, कीर्ती नवघरे, कळंबोली मंडल सरचिटणीस दिलीप बिष्ट, निर्दोष केणी, रमेश खडकर, संजय घरत, दिलीप जाधव, बीना गोगरी, निशा सिंग, गीता चौधरी, मोना अडवाणी, वनिता पाटील, चांदणी अवघडे, साधना पवार, प्रतीक्षा कदम, आशा बोरसे, विनोद घरत, अमर उपाध्याय, मन्सूर पटेल, प्रभाकर जोशी यांच्यासह सर्व मंडल अध्यक्ष व विविध मोर्चा, सेल व आघाडीचे संयोजक उपस्थित होते.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply