Breaking News

अखेर ठाकरे सरकारला सुबुद्धी सुचली

देवेंद्र फडणवीसांचा टोला

मुंबई ः प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. संसर्ग रोखण्यासाठी राज्यभरात रविवारपासून रात्रीची जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्याचबरोबर कोरोना चाचण्यांची संख्याही वाढवण्यात येत आहे. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष भाजप कोरोना नियंत्रणासाठी चाचण्यांच्या संख्येवर भर देण्यावर आधीपासूनच आग्रही होता, मात्र वारंवार सांगूनही न ऐकणार्‍या महाविकास आघाडी सरकारला अखेर सुबुद्धी सुचली याबद्दल समाधान व्यक्त करतानाच विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला टोला हाणला आहे.
फडणवीस यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत विक्रमी वाढ होताना दिसत आहे. यावरून भाजप नेते व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी येणार्‍या काळात कोरोना चाचण्यांची संख्या वाढवून राज्याची पूर्ण क्षमता वापरली गेली पाहिजे, असे सांगत राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. तसेच कोरोना नियंत्रणाासाठी लॉकडाऊन हा उपाय नसून ’टेस्ट, ट्रेस अ‍ॅण्ड ट्रीट’ची त्रिसूत्री अवलंबा, असा सल्लाही राज्य सरकारला दिला आहे.  
अधिकाधिक 90 हजारांपर्यंत आणि तेही फारच थोडके दिवस! चाचण्या वाढवा, तोच कोरोना रोखण्याचा उत्तम मार्ग आहे, हे वारंवार सांगूनही न ऐकणार्‍या मविआ शासनाला अखेर सुबुद्धी सुचली. दैनंदिन चाचण्या एक लाखावर जाण्यासाठी कोरोनाच्या दुसर्‍या लाटेची वाट महाराष्ट्राला पाहावी लागली, असे ट्विट करीत देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारला फ टकारले आहे.
दुसर्‍या ट्विटमध्ये कोरोना चाचण्या वाढविण्याचे सूत्र त्यांनी सांगितले आहे. गेल्या 10 दिवसांत सरासरी 1,26,950 चाचण्या दररोज होत आहेत. असो, आता तरी हे सूत्र कायम ठेवा. येणार्‍या काळात चाचण्यांची संख्या आणखी वाढवून राज्याची पूर्ण क्षमता वापरली गेली पाहिजे, असेही फडणवीस यांनी सुचविले.

Check Also

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महाराष्ट्र राज्य, देश अशा सर्व स्तरावर पुढे जाण्यासाठी आगेकूच …

Leave a Reply