Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त मुलांसाठी ऑफलाइन कोचिंग क्लासेस

पनवेल : रामप्रहर वृत्त

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना विनापरिक्षा पास करण्यात आले आहे, परंतु ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे सर्वच विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. यासाठी आठवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना (सेमी/इंग्रजी/ सीबीएसई) तसेच 11 वी, 12वी (सायन्स/कॉमर्स) अशा मुलांसाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राजे प्रतिष्ठान कामगार सेना पनवेल – रायगड यांच्यावतीने प्रथम येणार्‍या 70 विद्यार्थ्यांना मोफत ऑफलाइन  शिक्षण उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

जेव्हापासून कोविड – 19 ची सुरुवात झाली तेव्हापासून सर्व काही शिक्षण हे ऑनलाइन पध्दतीने चालू आहे. सर्व वर्गातील विद्यार्थांना याचा काही फायदा झालेला नाही, एक प्रकारे त्यांचे फार मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. इयत्ता आठवी, नववी, दहावीच्या मुलांना तर गणित, इंग्रजी, तसेच विज्ञान या विषयाचे बिलकुल ज्ञान समजले नाही. आठवीच्या मुलांना आता गणित एकच विषय आहे, परंतु तीच मुले नववीच्या वर्गात गेल्यावर तेच गणित दोन भागात विभागले जातात, सायन्सदेखील त्याचप्रकारे दोन भागात विभागले जाते, या मुलांना जर आठवीमध्ये गणित, सायन्स, इंग्रजी विषयाचे बेसिक समजले नाही तर दहावीमध्ये या मुलांना कसे समजेल, आता त्यांच्या या विषयाचा पाया पक्का होणे अत्यंत गरजेचे आहे. मुलांचे शेक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून हे मोफत ऑफलाइन  शिक्षण उपलब्ध करून देण्यात येत आहे, असे प्रतिष्ठानच्या वतीने सांगण्यात आले आहे.

पनवेल तालुक्यातील कळंबोली, कामोठे, रोडपाली  परिसरातील सर्व विद्यार्थ्यांनी या क्लासेसचा फायदा घ्यावा, असे आवाहन प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे. नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी संपर्क सनिल कदम (8779684308), (9320646555). या क्लासेसचे नियोजनकेवल महाडिक व आशिष तांबे यांनी केले आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply