पाली : प्रतिनिधी
सुधागड तालुक्यातील शिळोशीत एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पास्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
शिळोशी येथील तक्रारदार व त्यांचे कुटुंबीय गुरुवारी (दि. 1) कामधंद्याकरिता बाहेर गेले असता फिर्यादी यांची सात वर्षांची नात घराच्या ओटीवर एकटीच खेळत होती. ती विकलांग व लहान असल्याचा गैरफायदा घेऊन आरोपी मोहन धोंडू शिर्के (वय 48, रा. शिळोशी) याने तिला त्याच्या राहत्या घरात नेऊन भाजलेला मका खायला दिला. त्यानंतर गालावर मुके घेऊन तिच्या मनात लज्जा उत्पन्न केली. त्यानंतर हा प्रकार तुझ्या घरात सांगू नकोस असे धमकावले. या प्रकरणी पाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक साबळे करीत आहेत.