Breaking News

रेवदंड्यामध्ये विनामास्क फिरणार्यांवर दंडात्मक कारवाई

रेवदंडा : प्रतिनिधी

येथील बाजारपेठेत विना मास्क फिरणार्‍यांवर रेवदंडा ग्रामपंचायत कर्मचार्‍यांनी दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे येथून जा-ये करणारे प्रवासी तसेच ग्रामस्थांना चांगलाच धाक बसला असून आता प्रत्येकांच्या चेहर्‍यावर मास्क दिसू लागला.

 कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रेवदंंडा ग्रामपंचायतीने मास्क व सॅनिटायझर वापरण्याचे तसेच सुरक्षीत अंतर ठेवण्याचे आवाहन केले असून, कोरोनाविषयक नियम न पाळणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे  विना मास्क फिरणार्‍या ग्रामस्थ व प्रवाशांना दंडात्मक कारवाईस सामोरे जावे लागत आहे. ग्रामपंचायत कर्मचार्‍यांनी पोलिसांच्या कारवाईचा बडगा उगारल्याने विना मास्क फिरणारे धास्तावले आहेत.

दुकानदार, फळे, भाजीपाला, जीवनाश्यक वस्तू विक्रेते आणि ग्राहकांनी सामाजिक अंतर राखण्याचे आवाहन रेवदंडा ग्रामपंचायतीने केले आहे.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply