Breaking News

खालापुरात दोन वाहने उलटली

खोपोली : प्रतिनिधी

खालापूर तालुक्यातील महामार्गावर रविवारी (दि. 4) सकाळी दोन वाहने उलटण्याच्या घटना घडल्या असून, त्यात जीवितहानी झाली नसली तरी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुंबई – पुणे महामार्गावरील हॉटेल बागेश्री जवळ रविवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास खोपोलीकडून पनवेलच्या दिशेने जाणारा ट्रक (एमएच-46,एएफ-2500)  उलटला तर खोपोली – पेण मार्गावर खोपोलीकडून पेणच्या दिशेने जाणारी कार (एमएच-12,केवाय -756)  सकाळी दहाच्या सुमारास उलटली. या दोन्ही अपघातांत वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, सुर्देवाने कोणतीही जीवितहानी झाली आहे. अपघातग्रस्त वाहनचालकांना परिसरातील नागरिकांनी मदत करून त्यांना अपघातग्रस्त वाहनांमधून सुखरूप बाहेर काढले.

Check Also

वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती; आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यातील वायू व जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांकडून घेतली जाणारी …

Leave a Reply