Breaking News

दोन अपघातांत सहा जण जखमी

पनवेल : वार्ताहर

पनवेल परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये सहा जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. पनवेलजवळील मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर किमी नं. 9च्या दरम्यान रविवारी (दि. 17) सकाळी भरधाव ब्रिझा गाडीने पुढे चाललेल्या ट्रकला पाठीमागून धडक दिली. या अपघातात ब्रिझा गाडीतील अतुल इज्जपवार (वय 22), अकुलसिंग गोथ (वय 18) व अमन चौधरी (वय 24) हे जखमी झाले आहेत; तर दुसर्‍या घटनेत मोहोपाडा नवीन पोसरी येथे स्कॉर्पियो गाडी व अ‍ॅक्टीव्हा मोटरसायकल यांची समोरासमोर धडक होऊन या अपघातात विश्वनाथ भोईर (वय 40), प्रणव भोईर (वय 8) व ओमकार पाटील हे जखमी झाले आहेत.

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply