Breaking News

महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील यांचा विश्वास; स्थापना दिन उत्साहात

खोपोली : प्रतिनिधी

जनहिताच्या दृष्टीने पक्षाची योग्य भूमिका जनतेला पटल्याने भविष्यात सर्वच निवडणुकीत भाजप नंबर एकचा पक्ष असणार आहे, असा विश्वास भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा अश्विनीताई पाटील यांनी मंगळवारी (दि. 6) येथे व्यक्त केला. भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून खोपोली शहर भाजप मध्यवर्ती कार्यालयात मंगळवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात अश्विनीताई पाटील बोलत होत्या. आगामी काळात भाजपला चांगले दिवस असल्याची ग्वाही त्यांनी या वेळी दिली. राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर जनता नाराज असून, भाजपचे वरिष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षाची भूमिका चोख बजावत आहेत. कार्यकर्त्यांनीही सदैव तत्पर राहून जनहिताची कामे करावीत, असे आवाहन अश्विनीताई पाटील यांनी उपस्थितांना केले कार्यकर्त्यांनी पक्षाच्या भूमिकेशी एकनिष्ठ राहून, जनहिताची कामे करावीत. आगामी नगरपालिका निवडणुकीत भाजपचा झेंडा फडवण्याच्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे, असे  भाजपचे खोपोली शहराध्यक्ष इंदरमल खंडेलवाल यांनी सांगितले. भाजप सरचिटणीस हेमंत नांदे,  उपाध्यक्ष दिलीप पवार, प्रमोद पिंगळे, नगरसेविका अपर्णा मोरे, युवा नेते सचिन मोरे, युवा मोर्चा शहर अध्यक्ष अजय इंगुलकर, पुनीत तन्ना, शहर सरचिटणीस गोपाळ बावस्कर, शहर महिला मोर्चा अध्यक्षा शोभाताई काटे,सरचिटणीस अश्विनी अत्रे, माजी शहराध्यक्ष विजय तेंडुलकर, युवा कार्यकर्ते सागर काटे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. प्रारंभी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष दीनदयाळ उपाध्याय, श्यामाप्रसाद मुखर्जी व भारतमातेच्या प्रतिमेला उपस्थितांनी पुष्प वाहून अभिवादन केले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी कोरोना नियमाच्या अधीन राहून बाजारपेठेतील व्यापार्‍यांना लाडू वाटून आनंद साजरा केला.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply