Breaking News

मुस्लीम कमिटीकडून कोविड रुग्णांना मदतीचा हात

उरण : प्रतिनिधी

उरण तालुक्यातील कोविड सेंटरमधील रुग्णांना उत्तम सुविधा मिळावी व रुग्ण लवकर बरे व्हावेत यासाठी विविध संघटनांच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे करण्यात येत आहे. उरणमधील मुस्लीम कमिटीनेदेखील आपल्या पवित्र रमजान महिन्यातील खर्च कमी करून काही भाग हा कोविड रुग्णांच्या मदतीसाठी दिला आहे. या मदतीमधून कोविड केंद्रासाठी आवश्यक साहित्य देण्यात आले आहे.

उरण तालुक्यासाठी कार्यरत असलेल्या कोविड सेंटरमध्ये काही दिवसांपूर्वी कर्मचारीसंख्या कमी असल्याने दोन डॉक्टर आणि दोन नर्स यांच्यावर रुग्णांना सेवा देण्यासाठी ताण येत होता. त्यामुळे रुग्णांना सेवा मिळत नसल्याची चर्चा सुरू होती, मात्र येथील खासगी 30 डॉक्टरांच्या टीमने मोफत सेवा देण्याचा निर्णय घेऊन रुग्णांना उत्तम सेवा देण्याचा वसा घेतला आहे, तर येथे आवश्यक असणार्‍या वस्तू मदतीच्या स्वरूपात देण्यासाठी विविध स्वयंसेवी संस्था पुढे सरसावू लागल्या आहेत.

अशाच प्रकारे उरण तालुक्यातील मुस्लीम कम्युनिटीने येथील कोरोना सेंटरमधील रुग्णांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. खैरूद्दारिन ट्रस्ट, युनायटेड चॅरिटेबल ट्रस्ट, हयातुल इस्लाम गरीब नवाज ट्रस्ट या संस्थांनीही यामध्ये सहभाग घेतला आहे. महत्त्वाचे म्हणजे रमजान या पवित्र महिन्यातील होणारा खर्च कमी करून ही मदत करण्यात आली आहे. या वेळी कोणताही धार्मिक भेदभाव न ठेवता एकमेकांसाठी मदतीचा हात पुढे करण्याची वेळ आली असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply