भाजपच्या शिबिरांना पनवेल परिसरात प्रतिसाद
पनवेल ः रामप्रहर वृत्त
कोरोना विषाणूचा विळखा दिवसेंदिवस अधिक घट्ट होत चालला आहे. त्यातच रुग्णांना अत्यावश्यक रक्ताचा तुटवडासुद्धा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिरे घेण्यात आली. त्यास रक्तदात्यांचा प्रतिसाद लाभला.
खांदा कॉलनीतील सीकेटी महाविद्यालय, कामोठ्यातील सुषमा पाटील विद्यालय आणि खारघर सेक्टर 11 येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये या रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांमध्ये प्रारंभी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यात आले.
या उपक्रमास भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी भेट देऊन रक्तदात्यांचा उत्साह वाढवला, तर या वेळी महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते दात्यांनी रक्तदान केले.
दरम्यान, भाजप ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष तथा नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्तही उत्कर्ष सांस्कृतिक, कला व क्रीडा मंडळ आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल मिडटाऊन यांच्या वतीने नवीन पनवेल येथील सीकेटी विद्यालयात रक्तदान शिबिर घेण्यात आले.
रक्तदान शिबिरांना स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, प्रभाग समिती सभापती समीर ठाकूर, अनिता पाटील, हेमलता म्हात्रे, ज्येष्ठ नगरसेवक अनिल भगत, शहर सरचिटणीस व नगरसेवक नितीन पाटील, नगरसेवक हरेश केणी, मनोहर म्हात्रे, प्रवीण पाटील, अॅड. नरेश ठाकूर, विकास घरत, विजय चिपळेकर, प्रदीप भगत, शत्रुघ्न काकडे, नगरसेविका सीता पाटील, राजेश्री वावेकर, वृषाली वाघमारे, रूचिता लोंढे, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, भाजप नेते राजेश पाटील, भाऊ भगत, प्रदीप भगत, वासुदेव पाटील, आदित्य भगत, किरण पाटील, दीपक शिंदे, अमर उपाध्याय, पनवेल शहर सरचिटणीस अमरीश मोकल, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा सचिव चिन्मय समेळ, पनवेल शहर अध्यक्ष रोहित जगताप, कामोठे शहर अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, युवा नेते समीर कदम, अभिषेक भोपी, गौरव कांडपिळे, शुभ पाटील, अक्षय पाटील, पप्पू खामकर, सचिन वास्कर, संजय मुळीक, जयश्री धापते, गीता चौधरी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व रक्तदाते उपस्थित होते.