Breaking News

बीसीसीआयने जाहीर केले वार्षिक करार

विराट, रोहित व बुमराह अ+ श्रेणीत

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ऑक्टोबर 2020 ते सप्टेंबर 2021 या कालावधीसाठी खेळाडूचे वार्षिक करार जाहीर केले आहेत. त्यानुसार विराट कोहली, रोहित शर्मा व जसप्रीत बुमराह यांनी ए प्लस श्रेणीत स्थान राखले असून, त्यांना वर्षाला सात कोटी रुपये मिळणार आहेत. एकूण चार श्रेणींमध्ये खेळाडूंची विभागणी करण्यात आली आहे.

रविचंद्रन अश्विन, चेतश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हार्दिक पांड्या, के. एल. राहुल, शिखर धवन, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, ऋषभ पंत व रवींद्र जडेजा यांनी ए श्रेणीत स्थान मिळवले असून, त्यांना पाच कोटी रुपये मिळणार आहेत, तर बी श्रेणीत पाच खेळाडू आहेत. यामध्ये मयंक अगरवाल, वृद्धीमान साहा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव व शार्दूल ठाकूर यांचा समावेश असून, त्यांना तीन कोटी रुपये मिळतील.

चौथ्या सी श्रेणीमध्ये दहा जणांना स्थान मिळाले आहे. यामध्ये कुलदीप यादव, नवदीप सैनी, दीपक चहर, हनुमा विहारी, अक्षर पटेल, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज व शुबमन गिल यांचा समावेश असून, त्यांना एक कोटी रुपये वार्षिक मानधन मिळणार आहे.

करारबद्ध खेळाडूंची यादी

अ+’ श्रेणी (7 कोटी) : विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रित बुमरा

‘अ’ श्रेणी (5 कोटी) : रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, लोकेश राहुल, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या.

‘ब’ श्रेणी (3 कोटी) : वृद्धिमन साहा, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, शार्दूल ठाकूर, मयांक अगरवाल

‘क’ श्रेणी (1 कोटी) : कुलदीप यादव, नवदीप सैनी, दीपक चहर, शुभमन गिल, हनुमा विहारी, अक्षर पटेल, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, यजुर्वेंद्र चहल, मोहम्मद सिराज.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply