Breaking News

नेरळ, कळंब बाजारपेठा रविवारी बंद

कर्जत : बातमीदार

कोरोनाचा वाढत असलेला प्रादुर्भाव रोखण्यासाठी  सर्वतोपरी उपाययोजना सुरू आहेत. आठवडाभर निर्बंध आणि वीकेण्डला पूर्णतः लॉकडाऊन लावण्यात आला आहे.

कर्जत तालुक्याच्या ग्रामीण भागातही त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होताना दिसत आहे. तालुक्यातील नेरळ, कळंब, कशेळे, कडाव येथील बाजारपेठा शनिवारी व रविवारी बंद ठेवण्यात आल्या होत्या.

कोरोना विषाणूंची साखळी खंडित करण्यासाठी ’ब्रेक द चेन’ ही मोहीम संपूर्ण महाराष्ट्रात लागू करून, लॉकडाऊन करण्यात येत आहे. याचा सर्वसामान्य जनतेस त्रास होत असला, तरी कोविड विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव प्रभावी उपाय आहे.

सध्या ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात कोविड रुग्ण संख्या वाढत आहे, त्यामुळे ब्रेक द चेन या मोहिमेला जनतेकडूनही प्रतिसाद मिळताना दिसून येते.

पोलीस प्रशासनही चोख कामगिरी बजावत असून नाक्या नाक्यावर लक्ष ठेऊन आहे. शनिवार, रविवारी नेरळ आणि कळंब येथील सर्व दुकाने बंद ठेऊन कोरोनाची चेन खंडित करण्यासाठी लोक सहकार्य करताना दिसून येत आहेत.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply