नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघाकडून तुफान फटकेबाजी करणारा एबी डिव्हिलियर्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी उत्सुक आहे. यंदा भारतात होणार्या ट्वेण्टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्याची तयारी त्याने दर्शवली आहे. याबाबत तो दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक मार्क बाऊचर याच्याशी चर्चा करणार आहे.
कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या विजयानंतर डिव्हिलियर्स म्हणाला, मागच्या वर्षी त्याने (बाऊचरने) मला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमनासाठी उत्सुक आहेस का विचारले होते, तेव्हा हो नक्कीच, असे त्याला सांगितले. आयपीएल संपल्यानंतर याबाबतची पुढील चर्चा केली जाईल. तेव्हा माझा फॉर्म व फिटनेस पाहावा लागेल, तसेच संघातील परिस्थितीही पाहावी लागेल. आताचा संघ चांगली कामगिरी करीत आहे. त्यात जर मला जागा असेल, तर नक्की मी खेळीन. आयपीएलनंतर बाऊचरसोबतच्या चर्चेची प्रतीक्षा आहे आणि त्यानंतर प्लान आखला जाईल.
मागच्या वर्षी कोरोनामुळे ट्वेण्टी-20 वर्ल्ड कप स्थगित करण्यात आला. तेव्हाही बाऊचर यांनी एबीच्या पुनरागमनाचे स्वागतच करू, असे सांगितले होते. 2019च्या वन डे वर्ल्ड कपनंतर एबीने 41 ट्वेण्टी-20 सामन्यांत 46.60च्या सरासरी व 162.55च्या स्ट्राईक रेटने 15 अर्धशतके झळकावली आहेत. आयपीएल 2020मध्ये त्याने पाच अर्धशतकांसह 14 डावांत 454 धावा चोपल्या. आता आयपीएल 2021मध्ये तीन सामन्यानंतर त्याची धावांची सरासरी ही 62.50 इतकी आहे.
Check Also
कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …