Breaking News

उरणमध्ये दुकानांसाठी नवीन नियमावली

उरण : वार्ताहर

मुंबई, नवी मुंबई, पनवेलबरोबरच उरणमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. नियमांचे पालन करून नक्कीच कोरोनावर मात करता येईल, असा विश्वास येथील डॉक्टर, तहसीलदार, शासकीय अधिकारी यांनी व्यक्त केला आहे. उरणमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी उरण व्यापारी असोसिएशनच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात आले असून, दुकानांच्या वेळांबाबत नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

यानुसार मंगळवार (दि. 20)पासून गुरुवार (दि. 21)पर्यंत सर्व दुकाने बंद ठेवावी. शुक्रवार (दि. 23) रोजी सर्व दुकाने सुरू राहतील. शनिवार (दि. 24) व रविवार (दि. 25) सर्व दुकाने बंद ठेवावी. मेडिकल विक्रेते वगळून बाकी सर्व विक्रेते यांनी दुकाने बंद ठेवावी. दूध विक्रेते यांनी आपली दुकाने सकाळी 7 ते सकाळी 10 वाजेपर्यंत सुरू ठेवावी. सद्य परिस्थितीनुसार उरण शहरात वर्दळ रोखण्यासाठी पुन्हा वेळेत बदल करण्यात येईल. तरी वेळोवेळी सूचना देण्यात येईल. सर्व दुकानदार बंधूनी आणि उरणमधील सर्व नागरिकांनी मास्क लावावे. सोशल डिस्टन्सिंग ठेऊन सहकार्य करावे, असे उरण व्यापारी असोसिएशनच्या  वतीने जाहीर आवाहन करण्यात आले आहे.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply