Breaking News

नवी मुंबई पोलिसांकडून गरजूंना अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

पनवेल : वार्ताहर

कोरोनाचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून कडक निर्बंध लावण्यात आलेले आहे. लावण्यात आलेल्या कठोर निर्बंध काळात गरीब व गरजु लोकांना हाताला काम नसल्याने गरजवंत लोकांना नवी मुंबई पोलिसांकडुन अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. सीबीडी पोलीस ठाणे हद्दीतील टाटानगर झोपडपट्टी, से. 190 सीबीडी येथील 2580 कूटुंबियांना सीबीडी पोलीस ठाणे यांच्या वतीने अन्नधान्य वाटप करण्यात आले. हा उपक्रम वाशी परिमंडळ-1चे पोलीस उपआयुक्त सुरेश मेंगडे, तुर्भे विभाग सहाय्यक आयुक्त भरत गाडे यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली तसेच सीबीडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्याचप्रमाणे कॉन्टीनेन्टल वेअर हाऊसचे  अनिमेश विश्वास यांच्या सहकार्याने झाला. या कार्यकमादरम्यान कोविड-19 संदर्भात शासनाने निर्गमित केलेल्या सर्व सुचना व नियमांचे पालन करण्यात आलेले आहे. मागील वर्षातील लॉकडाऊन कालावधीतदेखील उपेक्षीत, गोर गरीब मजुर तसेच इतर राज्यातील मजुर वर्ग यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी सातत्याने प्रयत्नशील राहुन खुप मेहनत घेतली होती. त्याचप्रमाणे सध्या कडक निर्बंध लादलेले असल्याकारणाने नियम मोडणार्‍यांविरुध्द कठोर कारवाई करीत असतानाच गोरगरीब लोकांच्या अन्न-पाण्याची व्यवस्था करण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंह व सह आयुक्त डॉ. जय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गरजूंना मदत करण्यात येत आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply