Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासमवेत चलो प्रबळगड!

जागतिक योग दिनानिमित्त उपक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त
जागतिक योग दिनानिमित्त बुधवारी (दि. 21) सकाळी 6 वाजता भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासमवेत माची प्रबळगड येथे योगासने करण्याची संधी मिळणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून 21 जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. भारतीय ऐतिहासिक परंपरेचा अमूल्य ठेवा म्हणजे योग, जो भारताने विश्वाला प्रदान केला. सर्व जग कोरोनाच्या विळख्यात अडकलेले असताना भारतातील अनेक योग प्रशिक्षकांनी हे विश्वाची माझे घर हाच विचार ठेवून जगभर योग प्रशिक्षण दिले. विशेषत: मानसिक बळ वाढविण्यासाठी याचा उपयोग झाला. श्वसन मार्ग शुद्ध करणारी, फुफ्फुसांना बळकटी देणारी ‘जलनेती’ ही शुद्धीक्रिया कोरोना काळात सर्वांसाठी लाभदायक ठरली.
21 जून हा जागतिक योग दिन म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. योगातून मिळणार्‍या अनन्यसाधारण लाभांमुळे आज ही साधना जगात सर्वत्र लोकप्रिय आहे. त्या अनुषंगाने माची प्रबळगड येथे योग दिन साजरा केला जाणार आहे. यामध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासमवेत युवा व ज्येष्ठ मंडळी योगासने करणार आहेत.

Check Also

शिवाजीनगर क्रिकेट अकॅडमीच्या खेळाडूंची निवड

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून शुभेच्छा पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील शिवाजीनगर क्रिकेट अकॅडमी पुन्हा एकदा …

Leave a Reply