Sunday , October 1 2023
Breaking News

जडेजाच्या बळींचे शतक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाने पुन्हा एकदा आपल्या फिरकीची कमाल दाखवली आहे. जयपूरच्या सवाई मानसिंह मैदानात राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध खेळत असताना जडेजाने आयपीएलमध्ये आपल्या शंभराव्या बळीची नोंद केली आहे.

राजस्थानच्या स्टिव्ह स्मिथला माघारी धाडत जडेजाने आपल्या खात्यात शंभराव्या बळीची नोंद केली. आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेणार्‍या डावखुर्‍या फिरकी गोलंदाजांच्या यादीत जडेजाने आपले पहिले स्थान अबाधित राखले आहे.

धोनीचा ‘शंभर’नंबरी विजय

आयपीएलच्या बाराव्या हंगामात चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आपल्या नावावर अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे. आयपीएलमध्ये शंभर विजय मिळवणारा धोनी पहिला कर्णधार ठरला आहे. या यादीमध्ये गौतम गंभीर 71 विजयांसह दुसर्‍या स्थानावर आहे. त्यामुळे धोनीचे स्थान पुढची काही वर्ष अबाधित राहणार, हे नक्की मानले जाते.

Check Also

रायगडात अन्न व औषध प्रशासनाचे धाडसत्र

26 लाख 81 हजारांच्या माल जप्त; परवाना रद्दचीही कारवाई पेण ः प्रतिनिधी गणेशोत्सवादरम्यान सर्व पदार्थ …

Leave a Reply