Saturday , June 3 2023
Breaking News

तुराडेचे सरपंच चंद्रकांत भोईर भाजपत

पनवेल : रामप्रहर वृत्त

तुराडे गावच्या सर्वांगीण विकासासाठी गुळसुंदे ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, तसेच तुराडे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच चंद्रकांत नाना भोईर यांचे बंधु गोविंद नाना भोईर यांनी शनिवारी (दि. 13) रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण व सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपत जाहीर पक्ष प्रवेश केला.

खोपोली येथे झालेल्या कार्यक्रमास भाजप पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय टेंबे, गुळसुंदे पंचायत समिती अध्यक्ष सुनील माळी, पोयंजे पंचायत समिति अध्यक्ष सुर्वे, सावळे गावचे सरपंच संतोष माळी, माजी सरपंच डॉ. अविनाश गाताडे, गुळसुंदे सरपंच हरिश बांडे, सदस्य मनोज पवार, तुराडे गावचे युवा नेतृत्व निकेश ठाकूर, समीर गायकर, स्वप्निल ठाकूर, आपटे गावचे मोबिन मुल्ला, सुहास कदम आदी उपस्थित होते.

Check Also

सर्वांत मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचे शनिवारी पारितोषिक वितरण

पनवेल : रामप्रहर वृत्त शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य …

Leave a Reply