Breaking News

रिक्षाचालकांसाठी लकी ड्रॉ स्पर्धा

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य; विजेत्यांना आकर्षक बक्षिसांचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे 70 सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. लॉकडाऊन असो किंवा नसो कार्यक्रमाचे स्वरूप बदलले असले तरी कार्यक्रमात कुठेही खंड नाही. पनवेलमधील ट्रू रेट इन्शुरन्स यांच्यावतीने रिक्षाचालकांना कमी किंमतीत इन्शुरन्स काढण्याचे आवाहन संतोष आमले यांनी केले होते, तसेच 1 जानेवारी ते 21 एप्रिल 2021 पर्यंत इन्शुरन्स काढण्यात आलेल्या रिक्षाचालकांना लकी ड्रॉ अंतर्गत विजेते घोषित करून विजेत्यांना आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली होती.

ट्रू रेट इन्शुरन्सच्या माध्यमातून 1 जानेवारी ते 21 एप्रिल 2021 पर्यंत रिक्षा इन्शुरन्स काढणार्‍या रिक्षा चालकांसाठी लक्की ड्रॉची घोषणा राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या वतीने करण्यात आली होती. ह्या दरम्यान, एकूण 542 रिक्षा चालकांनी इन्शुरन्स काढला होता. त्यात 542 रिक्षाचालक लक्की ड्रॉला पात्र ठरवले. त्यातून 40 बक्षीसे काढण्यात आले.

यामध्ये संदीप कदम (एमएच 46 बीडी 5167) प्रथम बक्षीस मोबाईल, द्वितीय क्रमांक कुलर फॅन राजेंद्र मिसाळ (एमएच 46 बीडी 1628), संतोष भोईर (एमएच 46बीडी 4258) तर तृतीय क्रमांक ब्लूटूथ हेडफोन दत्तात्रय साळुंखे (एमएच 46एसी 2010), दीपक पाटील (एमएच 46 एझेड 7564), विनायक आचार्य (एमएच 46 सी 1455) खोपोली तसेच चौथ्या क्रमांकाचे बक्षीस पेन ड्राईव्ह जयवंत बेळे (एमएच 46 एझेड 6069), विनोद मोहिते (एमएच 46 एझेड 9831), श्री.बाबुराव पाटील (एमएच 46 सी 1608), राजू डोंगरे (एमएच 46 एझेड 6589) तर उत्तेजनार्थ बक्षीस घड्याळ एकूण 30 जणांना देण्यात आले.

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या लकी ड्रॉ स्पर्धांचे रिक्षाचालक व मालक यांच्याकडून कौतुक करण्यात येत आहे. या वेळी नवीन पनवेल अध्यक्ष संतोष आमले, उपाध्यक्ष विजय दुन्द्रेकर, सचिव सुरेश भोईर, पनवेल शहराध्यक्ष अनुराग वाकचौरे, खांदा कॉलनी अध्यक्ष मछिंद्र पाटील, ओमकार महाडिक यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

खारघरमध्ये गुरू तेग बहादुर यांच्या शहिदी समागमाला प्रारंभ; विविध कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे ‘हिंद दी …

Leave a Reply