Breaking News

पनवेल उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन गळती

त्रिस्तरिय व्यवस्थेमुळे अनर्थ टळला, रुग्ण सुरक्षित

पनवेल : प्रतिनिधी
येथील महाराष्ट्रभूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात मंगळवारी (दि. 27) दुपारी पाइपलाइनच्या व्हॉल्वमधून ऑक्सिजन गळती झाली. ही बाब लगेच लक्षात आल्याने त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात प्रशासनाला यश आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, यामुळे रुग्णांना कोणताही त्रास झाला नसल्याचे समजते.
पनवेल उपजिल्हा रुग्णालय हे जिल्हा कोविड रुग्णालय असल्याने येथे वर्षभर कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत. या ठिकाणी ऑक्सिजन बेड आणी व्हेंटिलेटरची व्यवस्था आहे. या रुग्णालयात 125पेक्षा जास्त रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. येथील रुग्णांना अखंडित ऑक्सिजन देता यासाठी 6 केएल क्षमतेच्या  प्लांटचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले होते. येथून पाइपलाइनद्वारे रुग्णांना  ऑक्सिजन पुरवठा केला जातो. हा प्लांट रुग्णालय प्रशासनातर्फे तीन प्रशिक्षित कर्मचारी ऑपरेट करतात. मंगळवारी दुपारी व्हॉल्वमधून ऑक्सिजन गळती सुरू झाली. या रुग्णालयात ऑक्सिजन प्लांटमध्ये त्रिस्तरिय सुरक्षा असल्याने वेळीच ही गळती कर्मचार्‍यांच्या लक्षात आली. या वेळी रुग्णांना ड्युरामधून ऑक्सिजन सुरू करण्यात येऊन त्याची त्वरित दुरुस्ती करण्यात आली. त्यामुळे अनर्थ टळला.
ऑक्सिजन गळतीची माहिती मिळताच जिल्हाधिकारी निधी चौधरी, महापौर डॉ. कविता चौतमोल, रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. बसवराज लोहारे, प्रांताधिकारी दत्तात्रय नवले, तहसीलदार विजय तळेकर, नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, उपायुक्त संजय शिंदे,  वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन पहाणी केली व सुरक्षिततेच्या दृष्टीने सूचना केल्या.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply