नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
भारतात गेल्या काही दिवसांपासून उच्चांक नोंदवणार्या दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत थोडा दिलासा मिळाला आहे. देशात मंगळवारी (दि. 27) सकाळी संपलेल्या 24 तासांत तीन लाख 23 हजार 144 रुग्णांची नोंद झाली, तर 2771 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, देशात गेल्या 24 तासांत दोन लाख 51 हजार 827 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून, आतापर्यंत एक कोटी 45 लाख 56 हजार 209 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार एकूण रुग्णसंख्येत 47.67 टक्के रुग्ण पाच राज्यांमधील असून, यात एकट्या महाराष्ट्राचा वाटा 15.7 टक्के आहे. देशातील एकूण रुग्णसंख्या एक कोटी 76 लाख 36 हजार 307 इतकी झाली आहे, तर 2771 मृत्यूंसोबत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या एक लाख 97 हजार 894वर पोहचली आहे. देशात सध्याच्या घडीला 28 लाख 82 हजार 204 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, तसेच 14 कोटी 52 लाख 71 हजार 186 जणांचे लसीकरण झाले आहे.
Check Also
सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण; मान्यवरांची उपस्थिती
उलवे नोड ः रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलचे …