Breaking News

पोलीस ठरले रुग्णांसाठी देवदूत!

लाइफ लाइन हॉस्पिटलला तत्काळ ऑक्सिजन पुरवठा

पनवेल ः वार्ताहर

पनवेल येथील लाइफ लाइन हॉस्पिटलमध्ये उपचार घेणार्‍या रुग्णांचा ऑक्सिजन पुरवठा अचानकपणे कमी झाला होता. अशा वेळी नवी मुंबई गुन्हे शाखेची पोलीस यंत्रणा त्यांच्या मदतीला धावून आली. काही तासांतच ऑक्सिजन पुरवठा सुरळीत केल्याने अनेक रुग्णांचे प्राण वाचले आहेत.

पनवेलच्या लाइफ लाइन हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्णांच्या उपचारासाठी बेडची सुविधा असून बर्‍याच रुग्णांना ऑक्सिजन सुरू आहे. विशेषतः लाइफ लाइन हॉस्पिटल येथे नवी मुंबई, रायगड, महामार्ग येथील 15 पोलीस व त्यांचे कुटुंबीय उपचार घेत आहेत. ऑक्सिजनची कमतरता असल्याने रुग्णांना केवळ चार-पाच तास पुरेल एवढाच ऑक्सिजन साठा उपलब्ध होता. ऑक्सिजनसाठी हॉस्पिटलचे अधिकार्‍यांची धावपळ सुरू होती. वेळेवर ऑक्सिजन उपलब्ध झाला नाही तर रुग्णांना इतर हॉस्पिटलमध्ये हलवावे लागण्याची भयंकर परिस्थिती निर्माण झाली होती.

अशा वेळी हॉस्पिटलचे डायरेक्टर पराग बेडसे यांनी नवी मुंबई पोलिसांकडे ऑक्सिजन पुरवठ्यासाठी विनंती केली. डॉ. बी. जी. शेखर पाटील यांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस आयुक्त विनोद चव्हाण व वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोल्हटकर यांच्यावर तत्काळ ऑक्सिजन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सोपविली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोल्हटकर व त्यांचे सहकारी अंमलदार सतीश सरफरे, अतिष कदम यांच्या सहकार्याने महापे येथे ऑक्सिजन पुरवठा करणार्‍या कंपनीमध्ये समक्ष जाऊन चर्चा करून 25 ऑक्सिजनचे कमर्शियल गॅस सिलिंडर 40 रुग्णांना दोन ते तीन दिवस पुरतील एवढे उपलब्ध करून लाइफ लाइन हॉस्पिटल पनवेल येथे विनामूल्य पाठविले. अशा प्रकारे वेळेवर मदत केल्याने रुग्णांना जीवनदायी ऑक्सिजन पुरवठ्याचे संकट दूर करून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली, तसेच तेथे नियमित ऑक्सिजन पुरवठा करण्यास सर्व कंपन्यांस सांगितले. या मदतीबद्दल रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांनी सर्वांचे आभार मानले आहेत.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply