Breaking News

भारताच्या सात महिला हॉकीपटू कोरोना पॉझिटिव्ह

बंगळुरू ः वृत्तसंस्था

भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल हिच्यासह सात खेळाडू तसेच दोन साहाय्यक कर्मचार्‍यांना करोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. बंगळुरू येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणामध्ये (साइ) सराव शिबिराला सुरुवात होण्याआधीच या सर्वांचे करोना अहवाल सकारात्मक आले आहेत.

या खेळाडूंमध्ये रामपाल, रविता पुनिया, शर्मिला देवी, रजनी, नवज्योत कौर, नवनीत कौर आणि सुशीला तसेच अमृताप्रकाश आणि वेन लोम्बार्ड या दोन साहाय्यक कर्मचार्‍यांचा समावेश आहे. 10 दिवसांच्या विश्रांतीनंतर टोकियो ऑलिम्पिकच्या तयारीसाठी भारतीय संघाचे सराव शिबीर बंगळुरू येथे सुरू होणार होते.

सरावाला सुरुवात होण्याआधी 25 खेळाडू विलगीकरणात होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply