महापौर कविता चौतमोल व सहकार्यांची केंद्रांमध्ये पाहणी
पनवेल ः प्रतिनिधी
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात शासनाच्या आदेशानुसार कोविड-19 लसीकरणाचा तिसरा टप्पा मार्चपासून सुरू करण्यात आला आहे. पालिका क्षेत्रातील चार नागरी आरोग्य केंद्र, टाटा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, तसेच 10 खासगी केंद्रांमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरण सध्या चालू आहे. महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी मंगळवारी (दि. 16) या लसीकरण केंद्रांना भेट देऊन आढावा घेतला.
या पाहणी दौर्यात महापौरांसमावेत स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, महिला-बालकल्याण सभापती मोनिका महानवर, प्रभाग समिती ‘अ’ सभापती अनिता पाटील, प्रभाग समिती ‘ब’ सभापती समीर ठाकूर, प्रभाग समिती ‘क’ सभापती हेमलता म्हात्रे, प्रभाग समिती ‘ड’ सभापती सुशिला घरत, नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, बबन मुकादम, नगरसेविका चारुशीला घरत, दर्शना भोईर, सीता पाटील, प्रमिला पाटील, विद्या गायकवाड, राजश्री वावेकर, महापालिकेचे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी, डॉ. मनीषा चांडक, वासुदेव पाटील, विनोद घरत, रविनाथ पाटील, कमल कोठारी सहभागी होते. या दौर्यादरम्यान सर्वांनी लशींची माहिती घेऊन लस घेतलेल्या नागरिकांशी विचारपूस करण्यात आली, तसेच लशींच्या साठवणुकीबद्दलची माहिती घेण्यात आली. याशिवाय खासगी रुग्णालयांमध्ये नागरिकांना दिल्या जाणार्या सुविधा आणि महापालिकेची परीक्षण (मॉनिटरिंग) टीम कशा पद्धतीने काम करते याचीही माहिती घेण्यात आली. या वेळी चारही प्रभागांमधील सरकारी व खासगी रुग्णालयांची पाहणी करण्यात आली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लस सुरक्षित असून, लाभार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने आवाहन करण्यात आले.