Breaking News

सीवूड आश्रमशाळेवर पालिका, सिडकोची धडक कारवाई

नवी मुंबई ः प्रतिनिधी

सिवूडस येथील बेथेल गॉस्पेल चॅरिटेबल ट्रस्टच्या आश्रमशाळेवर नवी मुंबई महापालिका आणि सिडको यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि. 2) धडक कारवाई करण्यात आली. या वेळी आश्रमातील काही जणांचे विस्थापन होणे बाकी होते, मात्र पोलिसांनी त्यांना बुधवारी हलवल्यानंतर ही निष्कर्षणाची कारवाई करण्यात आली आहे. नवी मुंबई भाजप महिला मोर्चाच्या वतीने सोमवारी वाशी  सिडको प्रदर्शनी केंद्रात महिला मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी नवी मुंबईतील वादग्रस्त आश्रमशाळेत भाजप प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ यांनी भेट दिली होती. ज्या आश्रमात मुलींवर अत्याचार झाले, संबंधित आश्रमचालक तुरुंगात गेला ते  आश्रम आजही कोणत्या पालिका अधिकार्‍याच्या आशीर्वादाने सुरू आहे? असा सवाल उपस्थित करून त्यांनी या प्रकरणी आयुक्त राजेश नार्वेकर यांची भेट घेऊन कारवाईसाठी सात दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. चित्रा वाघ यांनी दिलेल्या अल्टिमेटमनुसार मनपा आयुक्त आणि सिडकोच्या वतीने शुक्रवारी संयुक्त निष्कर्षणाची कारवाई करण्यात आली. कारवाईमध्ये पालिकेचे दोन अधिकारी, तीन  कर्मचारी, सहा सुरक्षारक्षक, 10 कामगार होते. या वेळी सिडकोचे वेणू नायर, मनपाचे रमेश राठोड आणि एनआरआय पोलीस ठाण्याचे वपोनि जगदाळे त्यांच्यासह 20 जणांचे पथक तैनात होते.

नवी मुंबई महानगरपालिका आणि सिडकोच्या संयुक्त विद्यमाने सिवूड येथील चर्च आणि आश्रमशाळेवर निष्कर्षणाची कारवाई करण्यात आली. आश्रमातील आश्रितांचे बुधवारी विस्थापन झाल्यानंतर कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली.

– डॉ. मिथाली संचेती, सहाय्यक आयुक्त, नवी मुंबई मनपा

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply