Breaking News

पनवेल मच्छीमार्केटमध्ये ग्राहकांची फसवणूक

पनवेल : प्रतिनिधी

पनवेलमधील मच्छीमार्केटमध्ये वजनकाट्यात फेरफार करून ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, त्यामुळे मांसाहारी खवय्यांत खळबळ उडाली आहे.

पनवेल महानगरपालिका हद्दीत अनेक मच्छीमार्केट आहेत. त्यातील गुणे हॉस्पिटलजवळ असलेल्या मच्छीमार्केटमध्ये वजनावर मच्छी घेणार्‍या ग्राहकांची विक्रेत्यांकडून  फसवणूक केली जाते.

वजनकाट्याच्या खालील बाजूला प्लास्टिक पिशवीत दगड किंवा तत्सम वस्तू बांधून ठेवल्याने ग्राहकाला किलोमागे 300 ते 350 ग्रॅम कमी वजन मिळते. ही बाब उघडकीस आल्याने विक्रेते व ग्राहकांत वाद होताना दिसत आहेत. अशाच प्रकारे इतरही ठिकाणी फसवणूक होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. 

विक्रेत्यांनी आपला इलेक्ट्रॉनिक काटा दरवर्षी व इतर काटे दोन वर्षांनी वैधमापनशास्त्र खात्यामार्फत छापून घ्यावयाचा नियम आहे, पण पनवेलच्या मच्छीमार्केटमधील विक्रेते आपले काटे छापून घेत नाहीत. त्यामुळे पनवेलमध्ये सामान्य ग्राहकांची फसवणूक होत आहे.

Check Also

नवीन पनवेलमधील आगग्रस्त कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आर्थिक मदत

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून घटनास्थळी पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवीन पनवेल सेक्टर 1/एस …

Leave a Reply