पेण : प्रतिनिधी
चिल्ड्रन्स फ्यूचर इंडिया (सीएफआय) तर्फे प्रकल्प प्रमुख डॉ. किशोर देशमुख यांच्या पुढाकाराने प्रतिपालीत 89 विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी चालू शैक्षणिक वर्षात सहा लाख 65 हजार रुपयांचे अर्थसहाय्य वाटप करण्यात आले. सीएफआय ही संस्था मुलांना उच्च शिक्षण घेण्यास प्रवृत्त करत आहे. संस्थेने आतापर्यंत आठ हजाराहून अधिक प्रतिपालीत विद्यार्थ्यांना मदत केली आहे. कोरोना महामारीच्या काळात बर्याच पालकांचा नोकर्या गेल्या आहेत, त्यामुळे मुलांची उच्च शिक्षणाची फी भरणे पालकांना अशक्य होऊन बसले अशा काळात सीएफआयने एकूण 89 प्रतिपालीत विद्यार्थ्यांना सहा लाख 65 हजार रुपयांचे अर्थसहाय्य केल आहे. मुलांचे शिक्षण पुढे चालू ठेवण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी किशोर देशमुख यांनी पुढाकार घेऊन अर्थसहाय्य केल्याबद्दल पालकांनी संस्थेचे आभार मानले आहेत.