Breaking News

छत्रपती शिवरायांचा अपमान केलेला नाही

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली : वृत्तसंथा
नवनिर्वाचीत राज्यसभा सदस्यांचा शपथविधी सोहळा बुधवारी पार पडला. या वेळी खा. उदयनराजे भोसले यांनी शपथ घेताना ’जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी जय शिवाजी’ अशी घोषणा दिली. यामुळे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी त्यांना सभागृहात अशा घोषणा देऊ नये, अशी समज दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय घोषावर आक्षेप घेतल्यामुळे नवा वाद निर्माण झाला. या वादावरुन उपराष्ट्रपतींवरही टीका करण्यात आली. यानंतर आता स्वतः व्यंकय्या नायडू यांनी आपली बाजू मांडली आहे. ’मी छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रशंसक, तर देवी भवानीचा उपासक राहिलो आहे. त्यांचा अनादर केलेला नाही,’ असे स्पष्टीकरण राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी दिले आहे.
व्यंकय्या नायडून यांनी ट्विटरवरुन आपले स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, ’मी छत्रपती शिवाजी महाराजांचा नेहमीच प्रशंसक, तर देवी भवानीचा उपासक राहिलो आहे. शपथ घेताना कोणत्याही घोषणा दिल्या जात नाहीत, याची परंपरेनुसार आठवण सभासदांना करुन दिली. अनादर केलेला नाही.’
सभापतींचे काहीच चुकले नाही : उदयनराजे
राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू काहीच चुकीचे बोलले नाही. रेकॉर्डवर फक्त शपथ जाईल, असे त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला असता तिथेच राजीनामा दिला असता, असे उदयनराजे भोसले म्हणाले. राज्यसभेची शपथ घेतल्यानंतर ’जय भवानी जय शिवाजी’ घोषणेवरुन सुरू असलेल्या राजकारणावर दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत उदयनराजे बोलत होते.

Check Also

शेकापचा माजी नगरसेवक सुनील बहिराच्या पोलीस कोठडीत वाढ

पनवेल : रामप्रहर वृत्त प्रॉपर्टीसाठी मयत वडिलांचे खोटे शपथपत्र बनवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी पनवेल तक्का …

Leave a Reply