पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा विश्वास
कर्जत : बातमीदार : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असलेले शरद पवार यांचा राजकीय वारस घोषित आहे. त्यामुळे ही निवडणूक कोणाचा वारस ठरवण्यासाठी नसून देशाचे भवितव्य ठरवण्यासाठी असल्याचे आपल्याला जनतेला पटवून द्यायचे आहे. त्या वेळी कोकणात पूर्वीपासून असलेली युतीची मक्तेदारी या वेळीही कायम राहील, असा विश्वास रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले आहे. महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ कर्जत येथील प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी पालक बोलत होते. देशातील 17व्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. 33 मावळ लोकसभा मतदारसंघातून भाजप-शिवसेना-रिपाइं-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रचारदौर्याचे आयोजन करण्यात आले होते. कर्जत येथे सिमरन मोटर्सच्या बाजूला महायुतीच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते करण्यात करण्यात आले. या वेळी उपस्थित कार्यकर्त्यांना पालकमंत्री चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. भाजप जिल्हाध्यक्ष व आमदार प्रशांत ठाकूर, शिवसेना संपर्क प्रमुख दत्ता दळवी, माजी आमदार देवेंद्र साटम, भाजप जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे, रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, भाजप जिल्हा सरचिटणीस वसंत भोईर, शिवसनेचे संतोष भोईर, मयूर जोशी, भरत भगत, रेखा ठाकरे, अनघा कानिटकर, संभाजी जगताप, पंढरीनाथ राऊत, आरपीआयचे राहुल डाळिंबकर, सहारा कोळंबे, नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल आदींसह मोठ्या प्रमाणात महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नेरळ, साळोख, मानिवली येथील कार्यकर्त्यांचा प्रवेश
नेरळ : मानिवली आणि साळोख गावातील कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात आज प्रवेश केला.जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि भाजप जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्या सर्व कार्यकर्त्यांचे भाजपत स्वागत केले. नेरळ भाजप शहर कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात नेरळ गावातील गोविंद राणे, संतोष साळुंखे यांच्यासह मानिवली गावातील चंद्रकांत डायरे आणि रोहिदास डायरे यांच्यासह साळोख गावातील मुद्दसर सैरे, सैफ सैरे, अफसास सैरे यांनी भाजपत प्रवेश केला. त्या वेळी माजी आमदार देवेंद्र साटम, भाजप जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर, तालुका अध्यक्ष पंढरीनाथ राऊत, भाजप प्रज्ञा प्रकोष्ठ कोकण संयोजक नितीन कांदळगावकर, भाजप नेरळ शहर अध्यक्ष अनिल जैन, भाजप तालुका चिटणीस प्रवीण पोलकम आदी उपस्थित होते.
लक्ष्मण लोहकरे भाजपत
कर्जत तालुक्यातील डोंगरपाडा गावचे रहिवासी असलेले रायगड जिल्हा परिषदेचे तालुक्यातील पहिले अध्यक्ष विठ्ठलराव लोहकरे यांचे चिरंजीव माजी सरपंच लक्ष्मण लोहकरे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. कशेळे येथे आयोजित कार्यकर्ता प्रवेश कार्यक्रमात जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी त्यांचे स्वागत केले. भाजप जिल्हा अध्यक्ष, सिडको महामंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, मुंबईचे माजी महापौर, शिवसेना संपर्क प्रमुख दत्ता दळवी, रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, जिल्हा चिटणीस रमेश मुंढे, भाजप तालुका अध्यक्ष पंढरीनाथ राऊत, शिवसेना तालुकाप्रमुख संभाजी जगताप, शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक रेखा ठाकरे, भाजप ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस राजेश भगत, भाजप किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष अशोक गायकर, भाजप किसान मोर्चा तालुका अध्यक्ष विनायक पवार, अनिल पिंपरकर, भाजप कार्यालयीन चिटणीस परशुराम म्हसे आदी उपस्थित होते.
ग्रामीण भागही महायुतीच्या प्रचाराने ढवळला
पनवेल : पनवेल तालुका भाजप अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात शिवसेना, भाजप, रिपाइं महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ जोरदार प्रयत्न सुरू असून, तालुक्यातील प्रत्येक गावागावांत महायुतीचे कार्यकर्ते प्रचारात सहभागी झालेले आहेत.
दापोलीत प्रचाराचा धडाका
पनवेल : मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ दापोली, ता. पनवेल येथे महायुतीतर्फे प्रचार करून मतदारांशी संवाद साधला गेला.
गव्हाण बेलपाडा शेलघर प्रचार रॅली
पनवेल : मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ गव्हाण, शेलघर, ता. पनवेल येथे महायुतीतर्फे प्रचार करून मतदारांशी संवाद साधला गेला.
पनवेलमधील मुस्लिम समाजही प्रचारात सहभागी
पनवेल : मावळमधील शिवसेना, भाजप महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारकार्यात मुसलमान समाजाने हिरिरीने भाग घेतला असून, पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदी निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला. या मुस्लिम कार्यकर्त्यांशी उपमहापौर विक्रांत पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर यांनी संवाद साधला.
बारवईत प्रचार
पनवेल : पनवेल तालुका भाजप अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल तालुक्यातील बारवई येथे मतदारांशी संवाद साधून महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना पुन्हा विजयी करण्याचे आवाहन केले.
पनवेल परिसरातून बारणे यांना मताधिक्य देणार -उपमहापौर
पनवेल : वार्ताहर :पनवेल शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचाराला उतरले असून आज प्रत्येक घराघरांत जाऊन महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांचा प्रचार केला जात आहे. पनवेलकरांकडून मिळत असलेल्या प्रतिसादामुळे निश्चितच बारणे यांना मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळेल, असा ठाम विश्वास पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी प्रचारादरम्यान व्यक्त केला आहे.पनवेल शहरात आता घराघरात जाऊन प्रचार करण्यात महायुतीने आघाडी घेतली असून त्यामुळे विरोधकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. आघाडीत असलेले अंतर्गत वाद त्यामुळे त्याचा मोठा फायदा महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना होणार आहे. त्याचप्रमाणे पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून होत असलेली विकासकामे याचा फायदासुद्धा बारणे यांना मिळणार आहे व गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त मतदान या वेळी बारणे यांना पडून त्यांचा विजय मोठ्या फरकाने होईल, असा विश्वास उपमहापौर विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी प्रचारादरम्यान व्यक्त केला आहे.