‘क्लॅरिअंट’ची सामाजिक बांधिलकी
रोहे : प्रतिनिधी
कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीमधील क्लॅरिअंट केमिकल्स इंडिया लिमिटेड या उद्योगसमूहाच्या वतीने परिसरात विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून क्लॅरिअंटकडून कारखान्यालगतच्या रोठ बुद्रुक गावाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले.
रोठ बुद्रुक गावामध्ये काही कोरोना बाधित आढळल्याच्या पार्श्वभूमीवर सरपंच नितीन वारंगे यांनी गावात फवारणी करणेबाबत क्लॅरिअंट प्रशासनाला विनंती केली होती. त्याला तात्काळ प्रतिसाद देत क्लॅरिअंट व्यवस्थापनाने संपूर्ण गावात औषध फवारणी करून दिली. सरपंच नितीन वारंगे, ग्रामपंचायत सदस्या वैभवी भगत, राजेश भगत, क्लॅरिअंटचे प्रशासन विभाग प्रमुख उदयन बडकस, सीएसआर समितीचे सुनील दळवी व पराग फुकणे उपस्थित होते.