पनवेल : रामप्रहर वृत्त
वाढत्या कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी लस हाच प्रभावी उपाय मानला जात आहे. त्यामुळे कोविडविरोधी लसीकरण केंद्रांवर नागरिकांची गर्दी होत आहे. त्यातच उन्हाची दाहकता वाढत असल्याने लसीकरण केंद्रावर येणार्या नागरिकांसाठी भाजपच्या नगरसेविका अरुणा भगत व माजी ग्रामपंचायत सदस्य प्रदीप भगत यांच्या माध्यमातून कामोठे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे तात्पुरते निवारा शेड बांधण्यात आले आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेविका अरुणा भगत व माजी ग्रामपंचायत सदस्य प्रदीप भगत यांनी स्वखर्चातून महापालिकेच्या कामोठे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाहेर तात्पुरते निवारा शेड बांधले आहे. लसीकरण केंद्रावर आलेल्या नागरिक या शेडचा विश्रांतीसाठी उपयोग करीत असून, समाधान व्यक्त करीत आहेत.
मोफत सॅनिटायझर फवारणी : कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासनावर येणारा ताण पाहता कामोठे सेक्टर 21, 22, 24 व 25 मधील अनेक सोसायट्यांमध्ये सॅनिटायझेशन वेळेवर होत नसल्याचे सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भगत व नगरसेविका अरुणा भगत यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी स्वखर्चातून फवारणीची सोय केली आहे. ज्या सोसायटीमध्ये पेशंट आढळला आहे त्यांनी 8850934678, 9372175336, 8898452999 या क्रमांकावर संपर्क साधून फवारणी करून घ्यावी, असे आवाहन अरुणा भगत व प्रदीप भगत यांनी केले आहे.