Breaking News

मास्कमुळे सौंदर्यप्रसाधनाच्या कंपन्या तोट्यात

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

महिल्यांच्या सर्व सौंदर्य प्रसाधनांच्या मागणीत प्रचंड घट झाली आहे. विशेष म्हणजे, कोरोनामुळे चेहर्‍यावर मास्क लावणे बंधनकारक असल्याने लिपस्टिकसह इतर सर्व सौंदर्य प्रसाधनांच्या मोठ्या कंपन्यांना कोट्यवधींचे नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे एकूणच नवी मुंबईसह राज्यातील सर्व ब्युटी पार्लरसह बाजारपेठ कोलमडली असून आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी आपले उत्पादन निम्म्यावर आणले आहे.

एकीकडे करोनाचे संकट आणि त्यामुळे असलेली आथक चणचण तर दुसरीकडे लग्नसमारंभ अथवा सार्वजनिक कार्यक्रमांवर आलेल्या निर्बंधामुळे गेल्या वर्षांभरापासून सौंदर्यप्रसाधनांची बाजारपेठ कोलमडली आहे. या बाजारपेठेत दोन हजारांहून अधिक कंपन्यांची विविध उत्पादने असून यामध्ये लॉरिअल, लॅकमे, एल-एटीन, मॅबेलीन, डिऑर, रेवलॉन अशा विदेशी कंपन्यांच्या प्रसाधनांची मागणी अग्रक्रमांकावर असते. सर्व प्रकारची प्रसाधने विदेशातून येतात तर काही भारतीय बनावटीचेदेखील आहेत.

सध्या पुरुषांसाठीदेखील विविध प्रकारची उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत, परंतु जेव्हापासून कोरोना आला तेव्हापासून खरेदी मर्यादित होत आहे. सध्या ब्युटी पार्लरसह सर्व सलून बंद असल्याने त्याचा फटका जास्त बसत आहे, तसेच मुखपट्टी बंधनकारक असल्याने लिपस्टिकसह चेहर्‍यावर लावण्यात येणार्‍या सर्व प्रसाधनांची विक्री कमालीची घटली आहे. व्यापार्‍यांच्या मते, केवळ नागपुरात वर्षांला चारशे कोटींचा व्यवसाय होत असतो, मात्र करोनामुळे हा व्यवसाय  70 टक्क्यांनी खाली घसरला आहे. सर्व सार्वजनिक कार्यक्रम बंद असल्याने नागरिक केवळ जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीलाच महत्त्व देत असून महिलांचे सजणे आणि नटणे जवळपास बंद झाले आहे.

राज्य सरकारकडून मदतीची अपेक्षा

विशेष करून नेलपेन्ट, आय लायनर, लिपस्टिक, फाऊंडेशन कॉमपॅक्ट, प्रायमर, ब्लश, रुज, आय शॅडो, मस्करा, हायलायटर आदी नेहमीच्या प्रसाधानांकडेही महिलांनी पाठ फिरवली आहे. कोरोनामुळे आमचा व्यवसाय अडचणीत आला आहे. राज्यात आमच्या समाजातील 25 लोकांनी आर्थिक परिस्थिती खराब असल्याने आत्महत्या केली. मात्र बँकेच्या कर्जाचे हप्ते, वीज बिल, दुकानाचे भाडे याबाबतीत मदत करून सरकारने आमच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे, असे महाराष्ट्र नाभिक संघटनेच्या अध्यक्ष भाग्यलता तळखांडे यांनी सांगितले.

Check Also

वावंजे, मानपाडा येथे विकासकामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघातील वावंजे निताळे आणि मानपाडा कातकरी वाडी येथे मंगळवारी (दि.28) …

Leave a Reply