Breaking News

उरण नगर परिषदेतील कामगारांचा सन्मान

उरण ः वार्ताहर

कोरोनाच्या संकटकाळात उरण नगर परिषदेमधील कामगार-कर्मचार्‍यांनी जीवाची पर्वा न करता साफसफाईचे महत्त्वपूर्ण काम केले. या सेवेबद्दल कामगार-कर्मचार्‍यांचे सोमवारी (दि. 3) उरण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष सायली म्हात्रे यांच्या हस्ते औक्षण करून त्यांना कोरोना योद्धे प्रमाणपत्र तसेच त्यांच्या सेवेप्रति आभार व्यक्त करण्यात आले.

या वेळी नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, भाजप उरण शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, नगरसेवक मेराज शेख, आरोग्य सभापती यास्मिन गॅस, भाजप उरण शहर युवा अध्यक्ष निलेश पाटील आदी उपस्थित होते. अनिल कासारे, प्रकाश मोरे, नरेश खेदू, नितीन कासारे, संतोष देवरे, धनेश कासारे, काशिनाथ वाघमारे, कैलास राठोड, शिधोधन जाधव, रमेश कांबळे, नितीन मोहिते, रवींद्र कांबळे, नरेश पावसकर, दिलीप गायकवाड आदींना कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करून प्रमाणपत्र देण्यात आले.

सर्व कर्मचार्‍यांनी कोरोनाच्या संकटकाळात चांगले काम केले आहे. त्याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करते. असेच सहकार्य पुढील काळात नगरपालिकेला करावे. नगरपालिकाही तुम्हाला वेळोवेळी सहकार्य करेल.

-सायली म्हात्रे, नगराध्यक्ष, उरण नगर परिषद

Check Also

गव्हाण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा

उलवे नोड : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ग्रामसभा शुक्रवारी (दि.१) माजी …

Leave a Reply