नवी मुंबई : प्रतिनिधी
जय गजानन मित्र मंडळाच्या वतीने कुकशेत येथे आयोजित लोकनेता चषक क्रिकेट स्पर्धा कुमार इलेव्हन, तुर्भे या संघाने जिंकली. सानपाड्याचा राजेश स्मृती संघ उपविजेता ठरला. माजी मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले. या स्पर्धेचे आयोजन नगरसेवक सुरज पाटील यांनी केले होते. स्पर्धेचे उद्घाटन महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते झाले. नगरसेविका सुजाता पाटील, जयश्री कातकरी यांच्यासह क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.