पनवेल : रामप्रहर वृत्त
कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर निराधार गरीब-गरजू व्यक्तींना दोन वेळचे अन्न पुरवण्यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर भोजन योजना सुरू करण्याचा निर्णय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेमार्फत महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक व आशा कि किरण फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बशीर कुरेशी यांनी घेतला आहे. कोरोना व लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अनेक लहान-मोठ्या व्यवसायांवर आर्थिक परिणाम झाला आहे. आजही अशा परिस्थितीमध्ये अनेक ठिकाणी लोक उपाशी झोपत आहेत. याची जाणीव ठेवूनच श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेमार्फत अध्यक्ष जितेंद्र खानविलकर उर्फ काकासाहेब यांच्या मागर्दर्शनानुसार व महाराष्ट्र संघटक अशोक शिगवण उर्फ अच्चूभाई, उपाध्यक्ष नारायण कोळी, महाराष्ट्र सरचिटणीस चंद्रकांत धडके मामा व कार्याध्यक्ष प्रकाश कोळी यांच्या सोबतीने महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक यांच्या संकल्पनेनुसार व आशा कि किरण फाऊंडेशनचे अध्यक्ष बशीर कुरेशी यांच्या साथीने लोकनेते रामशेठ ठाकूर भोजन योजना सुरू करण्यात येणार आहे. संपूर्ण लॉकडाऊनमध्ये ही भोजन सेवा अविरतपणे सुरू असणार असून लवकरच या भोजन सेवेचा शुभारंभ लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे केवल महाडिक यांनी सांगितले.