Breaking News

सागराचे संरक्षण करणे आपले कर्तव्य

सागरी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक भूषण कापडणीस यांचे प्रतिपादन

उरण : प्रतिनिधी

अलीकडचे जलमार्गाने होणारे अतिरेकी हल्ले यासाठी स्थानिक कोळी बांधवानी पोलिसांना सहकार्य करणे आवश्यक आहे. एखादी संशयित बोट किंवा संशयित खालाशांच्या हालचाली निदर्शनास आल्या, तर कोळी बांधवांनी पोलीस ठाणे यांना ताबडतोब निर्देश करावे आणि पोलिसांना मदत करावी, असे मोरा सागरी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक भूषण कापडणीस यांनी सागरी सुरक्षा याबाबत मार्गदर्शन करताना सांगितले.

ते म्हणाले की, कोळी बांधव हे स्वतः सागरपुत्र असल्याने सागराचे संरक्षण करणे हे त्यांचे कर्तव्य असल्याने त्यांनी सहकार्याची भूमिका बजावावी.

शासकीय आदेश आणि नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्या आदेशान्वये आणि परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि न्हावाशेवा बंदर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त व्ही. आर. दामगुडे यांच्या सहकार्याने उरणमधील हनुमान कोळीवाडा येथील श्रीराम मंदिरामध्ये सायंकाळी सागरी सुरक्षा रक्षक या विषयावर मच्छीमार कोळी बांधव आणि मच्छी विक्रेता महिला वर्ग यांना सागरी सुरक्षा रक्षक या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी  मोरा सागरी पोलीस ठाण्याच्या वतीने काल एका विशेष मार्गदर्शनपर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी सागरी सुरक्षा रक्षक या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी मोरा सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भूषण कापडणीस व त्यांचे सहकारी सचिन गोडे उपस्थित होते. त्यांच्या समवेत हनुमान कोळीवाडा ग्रामपंचायतीचे सरपंच परमानंद कोळी उपसरपंच राज शेवेकर, जनार्दन पांडुरंग कोळी, मंगेश कोळी, सागर कोळी, हिराजी कोळी, महादेव कोळी, रामचंद्र कोळी, नम्रता मंगेश कोळी, वनिता शरद कोळी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

Positive aspekte Bei Freispielen Frei Einzahlung Fur Bestandskunden Freispiele exklusive Einzahlung vorschlag je Bestandskunden enorme Vorteile

Welche vertiefen auf keinen fall doch nachfolgende Spielerbindung, zugunsten offenstehen zweite geige zusatzliche Wege, abzuglich …

Leave a Reply